Baramati : बहिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून युवकावर धारदार शस्त्राने वार

एमपीसी न्यूज-बारामती शहरातून पुन्हा एकदा सैराट ची पुनरावृत्ती (Baramati ) झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील देशमुख चौकात 15 एप्रिल रोजी एका 21 वर्षे तरुणावर धारदार शस्त्राने वार करत प्राणघातक हल्ला करण्यात आला. यातील दोन आरोपींना बारामती शहर पोलिसांनी अटक केली आहे. गौरव राकेश वर्मा आणि गणेश सुभाष गरगटे अशी आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अभिषेक प्रकाश वनवे या तरुणाचे आरोपीच्या बहिणी सोबत प्रेम संबंध होते. हे प्रेम संबंध संपवावेत यासाठी आरोपी अनेक वेळा फिर्यादी तरुणाला सांगत राहिले. मात्र फिर्यादी तरुणाने याकडे दुर्लक्ष केले होते. याच कारणावरून आरोपीने अभिषेक वनवे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. सर्वात आधी त्याला भेटण्यासाठी देशमुख चौकात बोलावले आणि त्याच्या पोटात चाकू खूपसुर ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

गंभीर जखमी झालेल्या या तरुणाला सुरुवातीला बारामती आणि नंतर ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. बारामती पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आणि दोन दिवस आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला आणि रक्ताने माखलेला चाकू जप्त केला आहे. बारामती पोलीस (Baramati ) या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.