Khadki : खडकीत चाकू गळ्यात खूपसून महिलेचा खून

एमपीसी न्यूज- खडकी बाजार परिसरात एका महिलेचा खून झाल्याने (Khadki ) एकच खळबळ उडाली आहे. 46 वर्षीय महिलेच्या गळ्यावर चाकूने वार करून निर्घृण खून करण्यात आलाय. काही वेळापूर्वी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. खडकी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अनैतिक संबंधातून हा संपूर्ण प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत महिला ही 46 वर्ष वयाची आहे. खडकी बाजार परिसरातच ती काम करते. काही वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले आहे. दरम्यान आज सकाळच्या सुमारास ही महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची दिसून आले. माहिती मिळताच खडकी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. खडकी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया (Khadki ) सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.