Nigdi : भुयारी मार्गाच्या कामाला गती द्या – सचिन काळभोर

एमपीसी न्यूज – निगडीतील भुयारी मार्गाच्या कामाला गती ( Nigdi) देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात काळभोर यांनी म्हटले आहे की, भक्ती-शक्ती उड्डाणपूल ते मधुकर पवळे उड्डाणपूल या ठिकाणी भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. त्याठिकाणी काही समाजकंटकांनी भुयारी मार्गाचे काम बंद पाडले आहे. निगडी भागातील नागरिकांना रस्ता ओलांडून जाण्या-येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागत होती. त्या अनुषंगाने निगडी गावठाण ते निगडी एसबीआय बँक या ठिकाणी भुयारी मार्गाचे काम सुरू केले होते.

Khadki : खडकीत चाकू गळ्यात खूपसून महिलेचा खून

त्याठिकाणी काही समाजकंटकांनी गेल्या तीन-चार दिवसांपासून हे काम बंद केले आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 12 जूनला सुरू होण्यापूर्वी निगडी गावठाण येथील भुयारी मार्गाचे काम पूर्ण ( Nigdi)  करण्यात यावे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.