Pimpri : एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज – एमआयडीसीकडून पिंपरी-चिंचवड शहरात करण्यात (Pimpri)  येणारा पाणीपुरवठा आज (सोमवारी) बंद आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Nigdi : भुयारी मार्गाच्या कामाला गती द्या – सचिन काळभोर

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रावेत येथील शुध्द पाणी पुरवठा केंद्रामधील देखभाल व दुरुस्तीचे कामकाज करण्यात येणार आहे. त्यासाठी  आज सकाळपासून रात्री 10 वाजेपर्यंत होणारा पाणी पुरवठा बंद राहील. तसेच उद्या (मंगळवारी)  पाण्याचा पुरवठा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, निगडी, सी.एम.ई., आर अॅन्ड डी दिघी, व्ही.एस.एन.एल. कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओ.एफ.डी.आर. या भागातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी. आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन (Pimpri)  एमआयडीसीकडून  करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.