Wakad : व्हिडिओ लाईकसाठी पैसे मिळतील सांगत एकाची नऊ लाखांची फसवणूक लाख

एमपीसी न्यूज – व्हिडिओ लाईक करा तुम्हाला त्याचा मोबदला (Wakad ) मिळेल म्हणत एका नागरिकाची तब्बल 8 लाख 96 हजार रुपयांची फसवणूक कऱण्यात आली आहे. यावरून पाच जणां विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा सारा प्रकार 12 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीत मोबाईलद्वारे घडला.

याप्रकरणी विभोर विनय शुक्ला (वय 33 रा. थेरगाव) यांनी रविवारी (दि.23) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून 254794155003, 3366458048 हे मोबाईल क्रमांक धारक, 2 महिला, फराह नावाचा इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी असताना त्यांना त्यांच्या व्हॉटसअपवर एसएमएस आला की व्हिडीओ ला लाईक करा आणि पैसे कमवा, त्यासाठी एक लिंक पाठवण्यात आली, त्या लिंकवरचा टास्क पुर्ण करण्याच्या बहाण्याने फिर्यादी कडून वेळोवेळी 8 लाख 96 हजार 400 रुपये घेतले. मात्र त्याचा कोणताही मोबदला दिला नाही. यावरून फिर्यादी यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून वाकड पोलीस याचा तपास करत (Wakad )आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.