Pune News : रेल्वे कर्मचाऱ्यांनी वृद्ध महिलेची औषधांची बॅग शोधून पाळला मानवतेचा धर्म

एमपीसी न्यूज : पुणे रेल्वे विभागातील कर्मचारी त्यांच्या नियमित कर्तव्यासोबतच प्रवाशांना मानवतावादी मदत आणि हरवलेल्या वस्तू परत करण्याच्या उदात्त (Pune News) हेतूने पुढे सरसावत आहेत. कर्मचाऱ्यांनी बॅग परत केली. याचाच एक भाग म्हणून रेल्वे कर्मचाऱ्यांनी वृद्ध महिलेची गाडीत राहिलेली औषधांची बॅग शोधून देऊन मानवतेचा धर्म पाळला आहे.

पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाच्या अनुसार उप स्थानक व्यवस्थापक अनिलकुमार तिवारी हे पुणे स्टेशनवर सकाळच्या ड्युटीसाठी तैनात होते.

Pune News : सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावर कारने घेतला पेट

यादरम्यान एक वृद्ध महिलने बारामती- पुणे गाडीत प्रवासा दरम्यान आपली बॅग चुकून गाडीत राहिली असून ती गाडी बहुदा यार्ड मध्ये पाठवली गेली आहे असे मांगितले.

त्यामुळे तिवारी यांनी यार्डात पाठवलेल्या गाडीचे प्रभारी बटवाल यांना फोन करून गाडीतील औषधांची बॅग शोधण्याची विनंती केली. तत्काळ कारवाई करत बटवाल यांनी (Pune News) बॅग शोधून ती पुणे स्टेशनवर नेली. तिवारी यांनी त्या महिलेने ती बॅग व्यवस्थित ओळखल्यानंतर बॅग तिला परत केली. यमुळे आनंद व्यक्त करत महिलेने रेल्वे प्रशासनाचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.