Railway : रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

एमपीसी न्यूज – मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड, मनमाड ( Railway ) विभागातील विसापूर आणि बेलवंडे स्थानकांदरम्यान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी ट्राफिक आणि पॉवर ब्लाॅक घेतला जाणार आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होणार आहे. अनेक गाड्या उशिराने धावतील, काही वळवल्या जातील तर काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.

हा ब्लॉक रविवार (दि. 29 ऑक्टोबर) ते शुक्रवार (दि. 3) रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.

उशिराने धावणाऱ्या गाड्या
दि – 29 ऑक्टोबर
12627 बेंगळुरू – नवी दिल्ली एक्सप्रेस 50 मिनिटे उशिराने धावेल
22685 यशवंतपूर- चंदीगड एक्सप्रेस 25 मिनिटे उशिराने धावेल

दि – 30 ऑक्टोबर
12131 पुणे- जबलपूर एक्सप्रेस 45 मिनिटे उशिराने धावेल
11078 जम्मू तावी- पुणे एक्स्प्रेस 30 मिनिटे उशिराने धावेल

दि – 1 नोव्हेंबर
11410 निजामाबाद – पुणे एक्सप्रेस 2 तास उशिरा धावेल
11409 दौंड- निजामाबाद एक्सप्रेस 1 तास उशिरा धावेल
11033 पुणे- दरभंगा एक्सप्रेस 20 मिनिटे उशिरा धावेल

11078 जम्मू तवी- पुणे एक्स्प्रेस 31 ऑक्टोबर रोजी 1 तास 20 मिनिटे उशिरा धावेल
12780 हजरत निजामुद्दीन-वास्को-द-गामा एक्सप्रेस 1 नोव्हेंबर रोजी 20 मिनिटे उशिरा धावेल
11077 पुणे- जम्मूतावी एक्सप्रेस 2 नोव्हेंबर रोजी 1 तास उशिरा ( Railway ) धावेल

वळवलेल्या गाड्या
11078 जम्मूतावी- पुणे एक्सप्रेस 1 नोव्हेंबर रोजी मनमाड – इगतपुरी – कल्याण – पनवेल – कर्जत -लोणावळा मार्गे वळवली जाईल
12780 हजरत निजामुद्दीन- वास्को-द-गामा एक्सप्रेस 2 नोव्हेंबर रोजी मनमाड- इगतपुरी- कल्याण- पनवेल- कर्जत- लोणावळा- पुणे मार्गे वळवण्यात येईल.

गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत बदल
02143 पुणे – नागपूर विशेष 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 04.00 ऐवजी सायंकाळी 06.15 वाजता सुटेल
22123 पुणे- अजनी एक्स्प्रेस 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 03.15 ऐवजी दुपारी 04.15 वाजता सुटेल
01431 पुणे – गोरखपूर विशेष 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 04.15 ऐवजी सायंकाळी 07.15 वाजता सुटेल

रद्द झालेल्या गाड्या –
11409 दौंड -निजामाबाद पॅसेंजर 30 ऑक्टोबर, 31 ऑक्टोबर, 2 नोव्हेंबर, 3 नोव्हेंबर रोजी रद्द
11410 निजामाबाद- दौंड पॅसेंजर 1 नोव्हेंबर, 2 नोव्हेंबर, 4 नोव्हेंबर आणि 5 नोव्हेंबर रोजी रद्द
01413 निजामाबाद – पंढरपूर पॅसेंजर 31 ऑक्टोबर, 1 नोव्हेंबर, 3 नोव्हेंबर आणि 4 नोव्हेंबर रोजी रद्द
01414 पंढरपूर- निजामाबाद पॅसेंजर 1 नोव्हेंबर, 2 नोव्हेंबर, 4 नोव्हेंबर आणि 5 नोव्हेंबर ( Railway ) रोजी रद्द

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.