PMPML : अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका क्रिकेट सामन्यासाठी पीएमपीएमएल सोडणार तीन ठिकाणाहून बस

एमपीसी न्यूज – सोमवारी (दि. 30) अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका हा सामना होणार ( PMPML ) आहे. हा सामना पाहायला जाणाऱ्यांसाठी पुणे महापालिका भवन, कात्रज आणि निगडी या तीन ठिकाणावरून गहुंजे स्टेडीयमसाठी विशेष बस सोडण्यात येणार आहेत.

वर्ल्ड कप क्रिकेट सामने सुरु आहेत. त्यातील पाच सामने पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील स्टेडीयमवर घेण्याचे नियोजन आहे. त्यातील पहिला सामना 19 ऑक्टोबर रोजी झाला.

आता 30 ऑक्टोबर रोजी दुसरा सामना होणार आहे. दरम्यान, शहराच्या कोणत्याही भागातून स्टेडीयमवर जाण्यासाठी कोणतीही सार्वजनिक वाहतूक ( PMPML ) सेवा नसल्याने पीएमपीएमएलने क्रिकेट प्रेमींसाठी खास सोय केली आहे.

Railway : रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

बस प्रवासासाठी असेल एवढे तिकीट

पुणे महापालिका भवन ते गहुंजे स्टेडीयम आणि कात्रज ते गहुंजे स्टेडीयम दरम्यान एकेरी मार्गावर 100 रुपये तर निगडी ते गहुंजे स्टेडीयम दरम्यान एकेरी मार्गावर 50 रुपये तिकीट असणार आहे.

बस सुटण्याची वेळ

30 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता सामना सुरु होणार आहे. त्यामुळे पुणे महापालिका भवन येथून सकाळी 11.00, 11.35 आणि दुपारी 12.05 वाजता तीन बस सुटतील.

निगडी बस स्थानकावरून दुपारी 12.00 आणि 12.30 वाजता तर कात्रज येथून सकाळी 11.00, 11.30 वाजता बस सुटणार ( PMPML ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.