Railway : रेल्वेच्या सर्व सुविधा येणार एकाच अ‍ॅपमध्ये

एमपीसी न्यूज – भारतीय रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी एक (Railway)सुपर अ‍ॅप तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्रवाशांना वेगवेगळ्या सुविधांसाठी वेगवेगळ्या अ‍ॅपवर माहिती घ्यावी लागते. मात्र सुपर अ‍ॅप मध्ये सर्व सुविधा एकाच ठिकाणी असणार आहेत.

भारतीय रेल्वेने प्रवाशांना यानिमित्ताने चांगली बातमी दिली आहे.( Railway)सुपर अ‍ॅपचा देशातील कोट्यावधी रेल्वे प्रवाशांना फायदा होणार आहे. हे सुपर अ‍ॅप तयार करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने 90 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. रेल्वेचा आयटी विभाग म्हणजेच CRIS या अ‍ॅपची निर्मिती करणार आहे.

Holiday 2024 : सन 2024 मध्ये 25 सार्वजनिक सुट्ट्या; दिवाळीला तीन दिवस असेल सुट्टी

सध्या तिकीट बुकिंगसाठी रेल्वेचे IRCTC हे अ‍ॅप उपलब्ध आहे. मात्र इतर गोष्टींसाठी प्रवाशांना विविध अ‍ॅप वापरावे लागतात. नवीन सुपर अ‍ॅपमध्ये रेल मदद, UTS, नॅशनल ट्रेन एन्क्वायरी सिस्टीम (NTES), पोर्टरीड, सतर्क, IRCTC रेल कनेक्ट, IRCTC ई-केटरिंग, IRCTC एअर अशा कित्येक सुविधा इंटिग्रेट होणार आहेत.

एकाच अ‍ॅपमधून रेल्वेचे तिकीट बुक करणे, रेल्वे ट्रॅक करणे, जेवण ऑर्डर करणे, तक्रार दाखल करणे यासह अनेक सुविधा मिळणार आहेत. लवकरच रेल्वे मंत्रालयाकडून हे अ‍ॅप प्रवाशांच्या सेवेत सादर होणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.