Holiday 2024 : सन 2024 मध्ये 25 सार्वजनिक सुट्ट्या; दिवाळीला तीन दिवस असेल सुट्टी
एमपीसी न्यूज – राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सन 2024 या वर्षातील (Holiday 2024) सार्वजनिक सुट्ट्यांची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार वर्ष 2024 मध्ये 25 सार्वजनिक सुट्ट्या असणार आहेत. यावर्षीपासून भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीला आता तीन दिवस सुट्टी असेल.
याव्यतिरिक्त बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी 1 एप्रिल रोजी सुट्टी देण्यात आली आहे. ही सुट्टी कोणत्याही शासकीय कार्यालयांसाठी लागू नाही. 1 एप्रिल रोजी आर्थिक वर्षाची सुरुवात होते. त्यासाठी बँकांना वार्षिक लेखे पूर्ण करण्याचे काम असते. म्हणून केवळ बँकांसाठी ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
PMRDA : पीएमआरडीएच्या पदभरतीला लागणार वर्षभराचा कालावधी
यावर्षी तीन शासकीय सुट्ट्या रविवारी आल्या आहेत. तर 15 ऑगस्ट या दिवशी दोन सुट्ट्या एकत्र आल्या आहेत. तसेच चार सुट्ट्या सोमवारी आल्या असल्याने रविवारला लागून सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे या सुट्ट्यांच्या दिवशी बाहेर जाण्याचे नियोजन (Holiday 2024) करता येणार आहे.
सुट्टीचा दिवस दिनांक (वार)
प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी (शुक्रवार)
छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी (सोमवार)
महाशिवरात्री 8 मार्च (शुक्रवार)
होळी (दुसरा दिवस) 25 मार्च (सोमवार)
गुड फ्रायडे 29 मार्च (शुक्रवार)
गुढीपाडवा 9 एप्रिल (मंगळवार)
रमझान ईद (ईद उल फितर) 11 एप्रिल (गुरुवार)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल (रविवार)
रामनवमी 17 एप्रिल (बुधवार)
महावीर जन्म कल्याणक 21 एप्रिल (रविवार)
महाराष्ट्र दिन 1 मे (बुधवार)
बुद्ध पौर्णिमा 23 मे (गुरुवार)
बकरी ईद (ईद उल झुआ) 17 जून (सोमवार)
मोहरम 17 जुलै (बुधवार)
स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट (गुरुवार)
पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) 15 ऑगस्ट (गुरुवार)
गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर (शनिवार)
ईद ए मिलाद 16 सप्टेंबर (सोमवार)
महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर (बुधवार)
दसरा 12 ऑक्टोबर (शनिवार)
दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) 1 नोव्हेंबर (शुक्रवार)
दिवाळी (बलिप्रतिपदा) 2 नोव्हेंबर (शनिवार)
भाऊबीज (अतिरिक्त सुट्टी) 3 नोव्हेंबर (रविवार)
गुरुनानक जयंती 15 नोव्हेंबर (शुक्रवार)
ख्रिसमस 25 डिसेंबर (बुधवार)