PMRDA : पीएमआरडीएच्या पदभरतीला लागणार वर्षभराचा कालावधी

एमपीसी न्यूज   – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) करण्यात येणाऱ्या पदभरती प्रक्रियेला ( PMRDA) वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

पीएमआरडीएमध्ये 407 पदांचा आकृतीबंध मंजूर झाला आहे. पीएमआरडीएच्या आस्थापनेवर तसेच करार पद्धतीने आणि प्रतिनियुक्तीने अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.

राज्य सरकारकडून मंजूर झालेल्या पीएमआरडीए आकृतीबंधात गट अ साठी 82, गट ब – 110, गट क 165 तर, गट ड साठी 50 पदांना मंजुरी मिळाली आहे. आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर आता याबाबत सेवा प्रवेश बनविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. हे सेवा प्रवेश राज्य सरकारला सादर करुन त्यासाठी मंजुरी घेतली जाणार आहे.

Delhi : नववर्षानिमित्त सद्गुरुंचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी लोटले हजारो भक्तगण

राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर पीएमआरडीएला सरळसेवा आणि प्रतिनियुक्तीने आवश्यक पदे भरता येणार आहे. पीएमआरडीएमध्ये सध्या प्रतिनियुक्तीवर गट अ – 35, गट ब – 21 आणि गट क – 16 जागांवर अधिकारी, कर्मचारी नियुक्त केलेले आहेत.

पीएमआरडीएतील पद भरतीबाबत महानगर आयुक्त राहुल महिवाल म्हणाले, पीएमआरडीएचा आकृतीबंध मंजूर झालेला आहे. त्यानुसार पद भरती प्रक्रिया राबविण्यासाठी अर्टी, शर्ती निश्चित कराव्या लागणार आहेत. तसेच, या पद भरती प्रक्रियेला वर्षभराचा कालावधी ( PMRDA) लागेल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.