Delhi : नववर्षानिमित्त सद्गुरुंचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी लोटले हजारो भक्तगण

एमपीसी न्यूज –  प्रेम हा मानण्याचा विषय आहे मनवण्याचा (Delhi)  नाही .याची जाणीव झाल्यानंतर आपण सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होऊन भक्तीमार्गावर अग्रेसर होऊ शकतो.” असे उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी नववर्षाच्या मंगल प्रसंगी बुराड़ी रोड, दिल्ली येथील ग्राउंड नं.8 येथे आयोजित केलेल्या विशेष सत्संग समारोहामध्ये व्यक्त केले. वर्ष 2024 च्या शुभारंभ दिनी आयोजित केलेल्या या सत्संगाचा लाभ प्राप्त करण्यासाठी दिल्ली व एनसीआर सहित इतर अनेक ठिकाणांहून हजारोंच्या संख्येने भक्तगण आले होते व त्यांनी सद्गुरुंचे दिव्य दर्शन व पावन प्रवचनाचा आनंद प्राप्त केला.

या कार्यक्रमात निरंकारी राजपिता रमितजी यांनी साध संगतला संबोधित करताना सांगितले, की निराकार ईश्वरावर आपली आस्था आणि श्रद्धा स्वानुभवावर आधारित असायला हवी. केवळ कोणीतरी सांगितले म्हणून नको. सद्गुरुकडून ब्रह्मज्ञानाद्वारे अंगसंग असलेल्या परमात्म्याचे दर्शन प्राप्त करुन भक्ती करणे उत्तम आहे. सद्गुरु सर्वांना समान रुपात ब्रह्मज्ञान प्रदान करुन जीवनमुक्त होण्याचा मार्ग सुगम करत आहेत. आपला स्वानुभव आणि खरीखुरी आवड यातूनच याची प्राप्ती होऊ शकते.

Pimpri :  पिंपरी-चिंचवड शहरातील भारत संकल्प यात्रेचा समारोप

सद्गुरु माताजींनी नुतन वर्षानिमित्त आपला पावन आशीर्वाद प्रदान करताना सांगितले, की बहुधा आपण आपल्या व्यावहारिक जीवनातील सीमित परिघांमध्ये संकुचित आणि भेदभावपूर्ण आचरण करत असतो. या प्रभावाच्या पलीकडे जाऊन जीवन जगण्यासाठी ब्रह्मज्ञानाला आधार करुन सर्वांभूती परमात्म्याचे रूप पहावे. आपण आपले विचार विशाल करुन प्रेमयुक्त जीवन जगायचे आहे. तेव्हाच संकुचित भाव मनातून नाहीसा होईल.

प्रेमभावनेवर आपले विचार व्यक्त करताना सद्गुरु माताजींनी आपल्या प्रवचनात सांगितले, की जेव्हा आपण परमात्म्याशी जोडले जातो तेव्हा कोणतेही बंधन उरत नाही. या बेरंग परमात्म्याशी नाते जोडल्यानंतर भक्तीचा पक्का रंग आपल्यावर चढतो ज्यायोगे आपली भक्ती आणखी सुद़ढ होत जातेत; परंतु भ्रमामुळे आपण या सत्याला विसरुन आपलीच विचारधारा दुसऱ्यांवर थोपवण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक पाहता प्रेम हा मानण्याचा विषय आहे मनवण्याचा नाही. आपण ब्रह्मज्ञानरुपी जागरुकतेनेच प्रत्येक कार्य करायचे आहे. सर्वांप्रती (Delhi) मनामध्ये प्रेमभाव धारण करुन भक्तीमय जीवन जगायचे आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.