India : 76 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ

एमपीसी न्यूज – ‘विश्वामध्ये शांतीसुखाचे वातावरण निर्माण व्हावे, असे प्रत्येकाला (India)  वाटत असते. प्रत्येक मानवाने शांतीपूर्ण जीवन जगावे अशी सर्वांची इच्छा असते. वास्तविक पाहता हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपल्या अंतर्मनात शांती येईल,’’ असे विचार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी 28 ऑक्टोबर रोजी 76 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या शुभारंभाप्रसंगी मानवतेसाठी दिलेल्या संदेशामध्ये व्यक्त केले.

‘‘शांती-अंतर्मनाची’ या मुख्य विषयावर आधारित हा तीन दिवसीय संत समागम निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा, हरियाणा येथे आयोजित करण्यात आला आहे. या संत समागमामध्ये  देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच विदेशातील अनेक देशांतून लाखोंच्या संख्येने भाविक भक्तगण सहभागी झाले आहेत. भक्तिभावाने ओतप्रोत वातावरणात या संत समागमाचा आज भव्य शुभारंभ झाला.

Maval : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 26 व्या गळीत हंगामाचा शुक्रवारी शुभारंभ

सद्गुरु माताजींनी शांती या विषयावर बोलताना म्हणाल्या, जर आपण स्वतःच अशांत (India)  आणि बेचैन असू,  अंतर्मनात उलथा-पालथ होत असेल तर आपण कुठेही गेलो तरी आपल्याला शांती मिळणार नाही.

जर खऱ्या अर्थाने आपल्याला शांती हवी असेल तर अगोदर आपण मानवी गुणांनी युक्त व्हावे लागेल. त्यानंतरच आपण अवघ्या विश्वासाठी वरदान ठरु शकतो. आपल्या मनात जर मानवतेचा भाव नसेल तर जीवनात शांती-सुख येऊ शकणार नाही.

जीवनात सर्वात मोठी शांती परमात्म्याला जाणून त्याच्याशी एकरुप होण्यामध्ये आहे. जेव्हा आपण परमात्म्याशी संलग्न होतो तेव्हा आपल्याला सदासर्वदा, सर्वत्र केवळ या प्रभू परमात्म्याचेच दर्शन घडत राहते आणि प्रेमभावाने युक्त होऊन मनामध्ये शांती धारण करुन त्याच्या लहरी आपण आपल्या कुटुंबात, प्रियजनांमध्ये, देशभरात आणि अवघ्या विश्वामध्ये पसरवत जाऊ शकतो, असे त्या म्हणाल्या.

तत्पूर्वी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांचे दुपारी समागम स्थळी आगमन होताच संत निरंकारी मंडळाचे प्रधान सी.एल.गुलाटीजी व कार्यकारिणी समितीच्या अन्य सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन तसेच पुष्पहार घालून त्यांचे हार्दिक स्वागत केले.

निरंकारी प्रदर्शनी

संत समागमामध्ये  निरंकारी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये मिशनचा इतिहास, विचारधारा आणि मिशनचे देश-विदेशातील मानवतावादी सामाजिक कार्य यांचे सुरेख चित्रण माॅडेल्स, छायाचित्रे तसेच दृकश्राव्य माध्यमातून करण्यात आले आहे.

यावर्षी या प्रदर्शनीमध्ये नजर-ए-सुकून, दिदार-ए-सुकून, रहमतें-ए-सुकून, बहार-ए-सुकून, एतबार-ए-सुकून, उम्मीद-ए-सुकून आणि सुकून-ए-सद्गुरु अशी आठ दालने तयार करण्यात आली आहेत.

या व्यतिरिक्त यावर्षी प्रदर्शनीला  6 भागांमध्ये विभाजित करण्यात आले आहे .ज्यामध्ये मुख्य प्रदर्शनी व्यतिरिक्त स्टुडिओ डिव्हाईन, बाल प्रदर्शनी, स्वास्थ्य व समाज कल्याण विभाग प्रदर्शनी, थिएटर आणिं डिजाईन स्टुडिओ इत्यादिंचा (India)  समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.