Maval : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 26 व्या गळीत हंगामाचा शुक्रवारी शुभारंभ

एमपीसी न्यूज – कासारसाई येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 26 वा गळीत हंगाम (Maval ) शुक्रवार (दि. 3 नोव्हेंबर) पासून सुरू होणार आहे. याच वेळी कारखान्यावर आसवणी (ईथेनॅाल) प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमीपुजन देखील होणार आहे. गळीत हंगामाची माहिती देण्यासाठी कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे संचालक सुभाषराव जाधव,सुभाष राक्षे यांनी कार्यकर्त्यांसह आंदर मावळ तालुक्याचा दौरा केला.

याप्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष मुऱ्हे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष सुनिल दाभाडे, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष कैलास गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शिवाजी आसवले, जिल्हा युवक उपाध्यक्ष बाबाजी गायकवाड, शांताराम लष्करी, माजी सरपंच भूषण असवले,छगन लष्करी माजी उपसरपंच अविनाश आसवले,

स्वामी जगताप,नंदू असवले,अनिल असवले, अनंता पावशे,बाळासाहेब तुर्डे,दत्ता तुर्डे,अनिल आलम,दिलीप आंबेकर, गबाजी पिंगळे,बळीराम वाडेकर,दत्ता खांडभोर,मुकुंद खांडभोर,शंकर हेमाडे,दत्तात्रय चिमटे,गुलाबराव गभाले,माऊली जगताप, एकनाथ मोरमारे,भरत लष्करी,रामदास करवंदे, अनेक गांवचे सरपंच, उपसरपंच मान्यवर उपस्थित होते.

Pune : पुणे जिल्ह्यातील 72 गावांमध्ये भूस्खलनाची शक्यता

आसवणी (ईथेनॅाल) प्रकल्पाचे भुमीपूजन व 26 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ होत आहे या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी मावळ तालुक्याचा दौरा कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार (दि 28) आंदरमावळचा पश्चिम भागाचा दौरा कारखान्याचे संचालक व कार्यकर्त्यांनी केला. प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकत्यांची बैठक वडेश्वर येथे घेण्यात आली.

बैठकीमधे कारखान्याचे संचालक सुभाषराव जाधव यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असुन सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती देखील संचालक जाधव यांनी केली आहे. या दौ-याला गांवा गावांतून (Maval ) उस्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.