Alandi : शिवतेज चौकात भर रस्त्यात असलेल्या विद्युत वाहिनीचा नागरिकांना होतोय अडथळा

एमपीसी न्यूज – आळंदी येथील शिवतेज चौकात ( Alandi ) विद्युत डीपीमधून गेलेली मोठी विद्युत वाहिनी (केबल) बरेच दिवसांपासून रस्त्यावर आहे. या रस्त्यावरून  लहानांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत  तसेच दर्शन बारी जवळ असल्याने भाविकांची सतत ये जा  असते. एकादशी व सणासुदीला  येथे मोठी वर्दळ असते.

Holiday 2024 : सन 2024 मध्ये 25 सार्वजनिक सुट्ट्या; दिवाळीला तीन दिवस असेल सुट्टी

ती विद्युत वाहिनी (केबल ) रस्त्यावर असल्याने नागरिकांना चालण्यास तिथे अडथळा निर्माण होत आहे .तसेच  चुकून त्या केबलमध्ये पाय  अडकल्यास नागरिक पडण्याची शक्यता देखील स्थानिक नागरिकांनी वर्तवली आहे. त्यामुळे त्या विद्युत वाहिनीचा अडथळा होऊ नये अशी उपाय योजना करावी,अशी  स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

 संबंधित विद्युत कर्मचारी यांच्याशी मंगेश तिताडे यांनी संपर्क साधला असता, तेथील विद्युत वाहिनीचे काम  करून घेऊ असे आश्वासन काही दिवसांपूर्वी त्यांनी दिले होते. परंतु तेथील रस्त्यावर आलेल्या विद्युत वाहिनीचा अद्यापपर्यंत योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला नाही ,अशी माहिती मंगेश तिताडे यांनी दिली . तसेच ते म्हणाले, विद्युत खांब जवळील मागील बाजूचे डीपीचे झाकण नादुरुस्त असून तिथे योग्य ती ( Alandi ) दुरुस्ती करावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.