Pimpri : पवनाथडी जत्रेसाठी 750 महिला बचत गटांचे अर्ज

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या पवना थडी जत्रेत वस्तू व (Pimpri) साहित्यासाठी स्टाॅल मिळावे, यासाठी शहरातील 750 महिला बचत गटांचे अर्ज आहेत. या अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर सोडत काढून स्टॉलचे वितरण केले जाणार असल्याची माहिती समाज विकास विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरात 19 हजार 500 महिला बचत गट आहेत. या महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू व साहित्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत दरवर्षी पवना थडी जत्रेचे आयाेजन केले जाते. यावर्षी पवना थडी जत्रा (दि.11) ते (दि.15) जानेवारी या पाच दिवसांच्या कालावधीत सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर हाेणार आहे.

Alandi : शिवतेज चौकात भर रस्त्यात असलेल्या विद्युत वाहिनीचा नागरिकांना होतोय अडथळा

या जत्रेत शहरातील महिला बचत गटांचे 400 स्टॉल असणार आहेत. एका स्टाॅलमध्ये दाेन बचत गटांना विभागून जागा देण्यात येणार आहे. बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू, आदींसह खाद्यपदार्थाचे स्टॉल असणार आहेत. स्टॉलसाठी बचत गटांकडून अर्ज मागविण्यात आले (Pimpri) हाेते. त्यानुसार 750 महिला बचत गटांचे स्टाॅलसाठी अर्ज आले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.