Amruta Fadanvis : अमृता फडणवीस यांच्या ‘तिला जगू द्या’ गाण्यावर ‘डिसलाईक’चा पाऊस

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांचं ‘तिला जगू द्या’ हे नवं मराठी गाणं रिलीज झालं आहे. अमृता फडणवीस यांचं हे नवीन गाणे लोकांना फारसं आवडलं नाही. यूट्यूबवर रिलीज झालेल्या या गाण्यावर डिसलाइक्सचा पाऊस पडला आहे. शिवाय अनेकांनी आपली नापसंती प्रतिक्रिया देऊन व्यक्त केली आहे.

भाऊबीजेच्या मुहूर्तावर ‘तिला जगू द्या’ हे नवीन गाणं यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलं. या गाण्यात मुलींच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आला आहे. गाण्यांच्या माध्यमातून मुलींना वाचवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

आतापर्यंत हे गाणं सुमारे पंधरा लाख लोकांनी पाहिलं आहे. त्यापैकी सात हजार लोकांनी या गाण्याला लाइक्स केलं आहे तर जवळपास 47 हजार लोकांनी या गाण्याला डिसलाइक्स केलं आहे.

एवढंच नाही तर यूट्यूब आणि सोशल मीडियावरही या गाण्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. ‘यांच्यापेक्षा ढिन्चॅक पूजा परवडली’, ‘लोकांना गाणं आवडलं नाही तर, शिवसेनेला दोष देऊ नका’, अशा कमेंट काही लोकांनी दिल्या आहेत.

दरम्यान, राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकुर यांनी ‘अमृता फडणवीस यांचं नवीन गाण्याचा आशय चांगला आहे. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.