Pune news : राजा राममोहन रॉय जयंतीनिमित्त 22 सप्टेंबर रोजी रॅलीचे आयोजन

एमपीसी न्यूज : राजा राममोहन रॉय यांच्या 250 व्या जयंतीनिमित्त शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे मार्फत ‘महिला सक्षमीकरणावर शालेय मुलांच्या जनजागृती रॅली (Pune news) ’चे 22 सप्टेंबर 2022 रोजी आयोजन करण्यात आले आहे.

भारत सरकारने राजा राममोहन रॉय यांची जयंती देशभरात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचे निश्चित केले आहे. या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून ही रॅली आयोजित करण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये पुणे शहरातील 250 शालेय विद्यार्थी- विद्यार्थीनी, शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी यांच्या सहभागाने आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Pashan-Sus flyover : शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

रॅलीची सुरवात सकाळी 10 वा. सारसबाग येथून होणार असून बाजीराव रोड मार्गे शासकीय विभागीय ग्रंथालय, न. वि. गाडगीळ शाळा, शनिवार पेठ, पुणे येथे समारोप होणार आहे.(Pune news) रॅलीचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे मालमत्ता व व्यवस्थापन उपआयुक्त राजेंद्र मुठे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रंथालयाचे प्र. ग्रंथपाल सु. द. रिद्दीवाडे यांनी दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.