Ram Mandir : श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पुण्यातील कुरेशी समाजाचा महत्वाचा निर्णय

एमपीसी न्यूज – अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी श्रीराम लल्ला ( Ram Mandir ) प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न होत आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ऑल इंडिया कुरेशी जमियतुल कुरेश एक्शन कमिटीने महत्वाचा निर्णय घेतला आहे. कुरेशी समाजाकडून 22 जानेवारी रोजी सर्व मांस विक्रीची दुकाने बंद ठेऊन त्या दिवशी लाडू आणि पेढे वाटले जाणार आहेत.

कुरेशी समाजाची बैठक नुकतीच पुणे येथे पार पडली. त्यावेळी सर्वानुमते हा निर्णय झाला असल्याचे ऑल इंडिया कुरेशी जमियतुल कुरेश एक्शन कमिटीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सादिक कुरेशी यांनी याबाबत माहिती दिली.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सादिक कुरेशी, पुणे शहर अध्यक्ष हसन अब्बास कुरेशी, पुणे शहर सचिव मेहमूदलाल कुरेशी, पुणे शहर उपाध्यक्ष आरीफ बशीर कुरेशी, सहसचिव वाहिद मजिद कुरेशी, नियाज अहमद कुरेशी, कार्याध्यक्ष अकबर हनीफ पटेल, सल्लागार हाजी नासिर कुरेशी, हाजी शादाब कुरेशी, हाजी शरीफ कुरेशी आदी उपस्थित होते.

अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी श्रीराम लल्ला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या कार्यक्रमाचा संपूर्ण देशभर उत्साह साजरा केला जात आहे. विविध समाज आणि संघटनांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. अनेकजण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून या आनंद सोहळ्यात सहभागी होत आहेत.

श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद कुरेशी समाजास होत आहे. श्रीराम हे सर्वधर्मासाठी अत्यंत पूजनीय आहेत. अयोध्येमधील त्यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद आणि उत्साह साजरा करण्यासाठी कुरेशी समाज या आनंदात सहभागी होत आहे.

कुरेशी समाजाकडून 22 जानेवारी रोजी मांस विक्रीची दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. सर्व व्यवहार बंद ठेऊन या दिवशी लाडू आणि पेढे वाटप केले जाणार ( Ram Mandir ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.