Talegaon Dabhade : रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

एमपीसी न्यूज – अयोध्या येथे राम मंदिरात श्रीराम लल्ला मूर्ती(Talegaon Dabhade) प्राणप्रतिष्ठा सोमवारी (दि. 22) उत्साहात करण्यात आली. त्यानिमित्त निखिल उल्हासराव भगत मित्रपरिवार यांच्या सौजन्याने यशवंत नगर तपोधाम नागरिक यांच्या वतीने सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.

यशवंतनगर येथील गोळवलकर गुरुजी क्रीडांगण (गोल मैदान) यशवंतनगर, तळेगाव दाभाडे येथे सकाळी साडेसात पासून रात्री पर्यंत अभिषेक,हवन,पूर्णाहुती, महाआरती, महाप्रसाद, कीर्तन, भजन, असे भरगच्च कार्यक्रम पार पडले.

Pimpri : ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ शब्दधन काव्यमंचाचा उपक्रम

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र,अयोध्या श्री राम मंदिर लोकार्पण (Talegaon Dabhade )सोहळा निमित्त श्री रामजन्मभूमी अयोध्या नगरी येथे 500 वर्षांच्या अथक संघर्षानंतर व अनेक ज्ञात अज्ञात रामभक्त,कारसेवकांच्या बलिदानातून आपले आराध्य दैवत प्रभू श्रीराम मंदिर साकारले आहे व ह्या मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळयानिमित्त यशवंतनगर परिसरातील अनेक आबालवृद्ध, माता भगिनी,भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

सकाळी साडेसात वाजता पुण्यहवाचन,सव्वाआठ वाजता अभिषेक,साडेनऊ वाजता हवन, सकाळी अकरा वाजता पुर्णाहुती, साडे अकरा वाजता अयोध्या राममंदिर लोकार्पण सोहळा लाईव्ह प्रक्षेपण व महाआरती सोहळा ह्याची देहि याची डोळा सर्व आबालवृद्धांनी अनुभवला दुपारी साडेबारा ते तीन वाजेपर्यंत महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला.

तसेच रामभक्त कारसेवकांचा सन्मान यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सायं 5 ते 7 किर्तनभूषण क्रांतिगीता महाबळ यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ भाविकांनी घेतला. त्यानंतर ओजस्विनी भाव भक्तीगीत मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. रात्री आठ वाजता सर्व माता भगिनी,नागरीकांनी नयनरम्य दीपोत्सव व महाआरती सोहळा अनुभवला.

या कार्यक्रमाचे आयोजक यशवंतनगर तपोधाम नागरिक होते तर या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन नगरसेवक निखिल भगत मित्रपरिवाराने केले होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.