Ram Mandir : 22 जानेवारीला महाराष्ट्रात शासकीय सुट्टी जाहीर

एमपीसी न्यूज – अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात (Ram Mandir) संपन्न होत आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने 22 जानेवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर केली आहे.

श्रीराम लल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सर्वांना पाहता यावा यासाठी ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यासह इतरही राज्यांनी 22 जानेवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. तर काही राज्यांमध्ये आंशिक सुट्टी देण्यात आली आहे.

Pune : शासनमान्य ग्रंथालयांना पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

श्रीराम प्रतिष्ठान सोहळ्यासाठी देश विदेशातून पाहुणे येणार आहेत. कार्यक्रमाची तयारी जोरदार सुरू आहे. तसेच या सोहळ्याच्या धार्मिक कार्यक्रमांना मागील काही दिवसांपासून सुरुवात देखील झाली आहे. श्रीराम लल्लाची मूर्ती गुरुवारी (दि. 18) मंदिरात आणण्यात आली आहे. प्राणप्रतिष्ठा पूर्वीची विधिवत पूजा दररोज केली जात आहे.

दरम्यान, गुरुवारी केंद्र सरकारने देशभरातील सर्व केंद्रीय आस्थापनांना 22 जानेवारी (Ram Mandir) रोजी दुपारी अडीच वाजेपर्यंत अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.

आता महाराष्ट्र शासनाने देखील 22 जानेवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. या दिवशी राज्यातील सर्व आस्थापना, शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.