RBI : अजूनही 10 हजार कोटींच्या 2 हजारांच्या नोटा बाजारात शिल्लक

एमपीसी न्यूज – भारतीय रिजर्व बँकेने 2000 रुपये मूल्य असलेल्या ( RBI ) नोटा चलनातून परत घेण्याचा निर्णय घेतला. या नोटा जमा करण्यासाठी दोन वेळा अवधी वाढवून देण्यात आला. तरी देखील आणखी 3 टक्के म्हणजेच 10 हजार कोटी रुपयांच्या नोटा अजूनही बाजारात आहेत.

नोव्हेंबर 2016 मध्ये 2000 मूल्य असलेल्या नोटा छापण्यात आल्या. तत्पूर्वी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. त्यामुळे बाजारात चलनाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी 2000 रुपयांची नोट छापण्यात आली.

यामुळे अचानक उत्पन्न झालेली चलनाची कमी भरून काढता आली. त्यानंतर लगेच बाजारात इतर मूल्याच्या नोटा योग्य प्रमाणात आणण्यात आल्या. इतर मूल्यांच्या नोटांचे प्रमाण बाजारात योग्य होताच रिजर्व बँकेने 2000 मूल्याच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेतला.

Akurdi : कवी हा सत्याचा उपासक असतो – डॉ. भावार्थ  देखणे

19 मे 2023 रोजी याबाबत रिजर्व बँकेने घोषणा केली. सुरुवातीला 30 सप्टेंबर पर्यंत 2000 च्या नोटा सर्व बँकांमध्ये जमा करण्यास मुदत देण्यात आली. या मुदतीत पर्याप्त नोटा जमा न झाल्याने ही मुदत 7 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली. तरीही पूर्णपणे नोटा जमा झाल्या नाहीत.

त्यामुळे आरबीआयने देशभरातील आपल्या 19 कार्यालयांमध्ये नोटा जमा करण्यास परवानगी दिली. तसेच भारतीय डाक विभागाच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये 2000 रुपयांची नोट जमा करता येणार आहे.

19 मे 2023 या दिवशी बाजारात 2000 रुपयांच्या नोटांचे मूल्य 3.56 लाख कोटी रुपये एवढे होते. आता बाजारात अवघे 10 हजार कोटी रुपये राहिले असून 97 टक्के नोटा परत घेण्यात आल्या आहेत. 2000 रुपयांची नोट अजूनही वैध मुद्रा आहे. आपल्याकडील 2000 रुपयांच्या नोटांना पोस्ट ऑफिस मध्ये जमा करता येणार ( RBI ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.