Shrirang Barne: श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा महापालिका प्रशासनाला इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्यावतीने थेरगावातील डांगे चौकात फ्लॉवर ऑफ पँराडाइज शिल्प बसविण्यात येत आहे. त्यामुळे पुलावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव झाकले जात आहे. महापालिका प्रशासनाने येत्या दोन दिवसात हे शिल्प काढावे. अन्यथा मी स्वत: ते शिल्प काढून टाकेल, असा इशारा शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी दिला आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात खासदार बारणे (Shrirang Barne) यांनी म्हटले आहे की, महापालिकेत थेरगावचे प्रतिनिधीत्व करत असताना माझ्या पाठपुराव्याने डांगे चौकात पुल उभारण्यात आला. या पुलाला महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले. डांगे चौकात महाराजांचा मोठा पुतळा आहे. महाराजांकडे पाहिले की नागरिकांना वेगळी उर्जा मिळते.

Saint Tukaram Palkhi Sohala 2022 : दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा भक्तिचैतन्याचा संग, तुकोबांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान

 

स्मार्ट सिटीच्या नावाखाली महापालिका प्रशासन काही पण उद्योग करत आहे. कुठेही काहीही बसविले जात आहे. डांगे चौकात फ्लॉवर ऑफ पँराडाइज शिल्पा बसविण्यात येत आहे. त्यामुळे पुलावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव झाकले जात आहे. महाराजांच्या नावाचे, परिसराचे विद्रुपीकरण होत आहे. हे शिल्प येत्या दोन दिवसात हटविण्यात यावे. अन्यथा मी स्वत: हे शिल्प काढून टाकेल असा इशारा खासदार बारणे (Shrirang Barne) यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.