Pimpri: पंतप्रधान आवास योजनेचा अहवाल चुकीचा; सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप

0 98

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिका राबवित असलेल्या पंतप्रधान आवास योजनांचा प्रकल्प अहवाल चुकीच्या पद्धतीने तयार केला आहे. त्यामुळे महापालिकेचे सुमारे 150 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे याला जबाबदार असणा-या संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी,  अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे, जाणीव फाऊंडेशनचे अध्यक्ष अमर कापसे यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी हे निवेदन दिले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फ राबविण्यात येणा-या पंतप्रधान आवास योजनेच्या च-होली, रावेत आणि  बो-हाडेवाडी येथील निविदेचा प्रती चौरस फूट दर हा शहरातील बांधकामाच्या बाजार भावाच्या दुप्पट दराने काढला आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल चुकीच्या पद्धतीने तयार केला आहे. त्यामुळे महापालिकेचे 150 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे अहवाल चुकीच्या तयार करणा-या अधिका-यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: