Rahatani : सोसायट्यांच्या क्रिकेट स्पर्धेत रॉयल एलेगन्स सोसायटी प्रथम

एमपीसी न्यूज – रहाटणीतील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते देविदास तांबे यांच्या वतीने “महिला व पुरूष हाफ पीच डे-नाईट आप्पा तांबे प्रीमिअर लीग (एपीएल) क्रिकेट स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले होते. (Rahatani) त्यामध्ये पुरूषांच्या गटात रॉयल एलेगन्स सोसायटीने आणि महिलांच्या गटात साई लिला सोसायटीने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या संघांना भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.

रहाटणी परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये ओळख वाढावी या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते देविदास तांबे यांनी डे-नाईट एपीएल हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये सोसायट्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तब्बल 40 सोसायट्यांचे संघ सहभागी झाले होते. सोसायट्यांतील नागरिकांनीच ही स्पर्धा हातात घेत ती यशस्वी केली. स्पर्धेचे उद्घाटन आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी अमरावती शहराच्या माजी उपमहापौर संध्या टिकले उपस्थित होत्या.

Pune : काळ्या- पिवळ्या टॅक्सीच्या भाडेदरात वाढ

स्पर्धेत पुरूष गटात रॉयल एलेगन्स सोसायटीने प्रथम, लाइफ 360 पलटन सोसायटीने द्वितीय, तर साईलिला सोसायटीने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच महिलांच्या गटात साईलिला सोसायटीने प्रथम, क्रिस्टल पार्क सोसायटीने द्वितीय, तर ग्यानगंगा सोसायटीने तृतीय क्रमांक पटकावला. (Rahatani) या विजेत्या संघांना गोविंदराव तांबे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या हस्ते रोख पारितोषिक व सन्मानचिन्हे तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक संघाला सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी देविदास तांबे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शंकर जगताप म्हणाले, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या “खेलो इंडिया” स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी क्रीडा कौशल्य दाखवत भारताची मान उंचावली. आपल्या पिंपरी-चिंचवड शहराला देखील क्रीडानगरी म्हणून ओळखले जावे यासाठी (Rahatani) अनेक ठिकाणी क्रीडांगणे विकसित करण्यात येत आहेत. आपण सर्व खेळाडूंनी देखील आपल्या आवडत्या खेळात सहभागी होऊन राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले आणि आपल्या शहराचे नाव लौकीक करावे, असे आवाहन त्यांनी केले.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.