Kivle Accident : सोसाट्याचा वारा आला म्हणून घेतला होर्डिंगचा आधार; त्याच्याच खाली चिरडून पाच जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – देहूरोड कात्रज बाह्यवळण महामार्गावर किवळे (Kivle Accident) येथे सोमवारी (दि. 17) सायंकाळी होर्डिंग कोसळले. या होर्डिंगखाली पाच जणांचा मृत्यू झाला.

सोमवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सोसाट्याचा वारा सुटला. यामध्ये देहूरोड कात्रज बाह्यवळण महामार्गावर रस्त्याच्या बाजूला लावलेले एक होर्डिंग कोसळले. या होर्डिंगखाली पंक्चरचे दुकान होते. सोसाट्याचा वारा आल्याने दुकानाच्या आडोशाला काही नागरिक थांबले असताना ही घटना घडली.

 

या दुर्घटनेत चार महिला एका पुरुषाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. तर, जखमीना नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारी यांनी सांगितले की, साडेपाच वाजताच्या सुमारास किवळे येथे होर्डिंग पडल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रावेत पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Kivle) कटरच्या सहाय्याने होर्डिंग कट करून, तसेच जेसीबीच्या सहाय्याने होर्डिंग बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

 

सोमवारी सायंकाळी आलेल्या वादळामध्ये शहरात अन्य ठिकाणी देखील होर्डिंग कोसळल्याची (Kivle Accident) माहिती मिळत आहे. निगडी मधील ओटास्कीम येथे देखील वादळात होर्डिंग आणि सिग्नलचा खांब कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे

Chinchwad : सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी भावी शिक्षकांनी ज्ञानाची उंची वाढवा – विक्रम काळे

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.