Pimpri : अजितदादांच्या निर्णयाला माझा पाठिंबा – अण्णा बनसोडे

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार जो निर्णय घेतील. (Pimpri) त्याला माझा पाठिंबा असेल. ते जी भूमिका घेतील. त्यासोबत मी राहणार असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी सांगितले.

Kivle Accident : किवळे येथील होर्डिंग दुर्घटनेत पाच जण ठार

विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपबरोबर जाणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, की अजितदादा दुसऱ्या पक्षाबरोबर जाणार आहेत हे तुम्हाला आम्हाला नक्की माहिती नाही. (Pimpri) त्यांचे पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द झालेले आहेत. त्यांच्या भेट झाल्यावर नक्की काय आहे ते समजेल. मी अजितदादांचा कट्टर समर्थक आहे हे महाराष्ट्राला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना माहिती आहे. ते जो निर्णय घेतील त्यावेळी नक्कीच त्यांच्यासोबत राहणार आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.