Sangvi : विनयभंग प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – बहिणीच्या घरी गेलेल्या तरुणीच्या घरात घुसून विनयभंग करणाऱ्यांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी (दि.16) सायंकाळी सातच्या सुमारास पिंपळे गुरव परिसरात ही घटना घडली.

साईनाथ प्रल्हाद राठोड (वय 21), मलेश गोविंद राठोड (वय 19, दोघे रा. वैध वस्ती, पिंपळे गुरव) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी एका 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी तरुणी ही रविवारी पिंपळे गुरव येथे तिच्या बहिणीकडे राहण्यास आली होती. संध्याकाळी तरुणी घरात एकटीच असताना दोघे आरोपी त्याठिकाणी आले. साईनाथ याने तरुणीचा हात पकडून लगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच दोघांनी आपापसात संगनमत करून अश्लील वर्तन करत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता दोघांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक निकुंभ पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.