Pune : रस्ता चुकलेल्या 3 वर्षाच्या चिमुरडीला मुंढवा पोलिसांनी दिले नातेवाईकांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – घोरपडी परिसरात रस्ता चुकलेल्या 3 वर्षाच्या चिमुरडीला तिच्या पालकांचा शोध घेऊन काल सोमवारी (दि.17) सुखरूप रित्या तिच्या पालकांच्या ताब्यात दिल्याने मुंढवा पोलिसांचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

बोरसा प्रेमंतो दास (वय 3) असे रस्ता चुकलेल्या चिमुरडीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सोमवारी (दि.17) सायंकाळी 7 च्या दरम्यान घोरपडी परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना एक लहान मुलगी रस्त्याच्या कडेने रडत जाताना दिसली. दरम्यान पोलिसांनी तिला थांबवून तिला तिचे नाव आणि पत्ता विचारत चौकशी केली.
परंतु त्या चिमुरडीला कोणतीच माहिती पोलिसांना सांगता येत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी मुलीला घोरपडी पोलीस चौकीत आणले आणि त्या मुलीची माहिती मिळवण्यासाठी पोलीस आसपासच्या सर्व परीसरात फिरले आणि तेथील नागरिकांकडे तिची चौकशी केली. हा शोध चालू असताना पोलिसांना लहान मुलीचे नाव आणि पत्ता समजला. त्यानुसार तिच्या आईचा शोध घेऊन तिला पोलीस चौकीत बोलावून घेतले आणि 3 वर्षाच्या बोरसाला तिच्या आईच्या ताब्यात सुखरूप दिले.

या कामगिरीमुळे मुंढवा पोलिसांचे सर्वच स्तरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.