Sangvi : नदीत उडी मारून एकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – नदीत उडी मारून एका व्यक्तीने आत्महत्या केली. ही घटना (Sangvi) सोमवारी (दि. 11) दुपारी पिंपळे गुरव येथे घडली.
देवा विरप्पा चव्हाण (वय 40, रा. पिंपळे गुरव) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Pimple Gurav : गुरव समाजाचे प्रश्न शासन दरबारी आक्रमकपणे मांडणार – शीतल शिंदे

सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास देवा यांनी पिंपळे गुरव येथे नदीत उडी मारली. काही नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली.
अग्निशमन दलाने अवघ्या काही मिनिटांमध्ये देवा यांना बाहेर काढले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. देवा यांना दारूचे व्यसन असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगवी पोलिसांना सांगितले. आत्महत्येचे कारण समजू शकले (Sangvi) नाही. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.