Pimple Gurav : गुरव समाजाचे प्रश्न शासन दरबारी आक्रमकपणे मांडणार – शीतल शिंदे

अखिल गुरव समाज संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राच्या गावागावांमध्ये विखुरलेल्या गुरव समाजाचे एकत्रित संघटन करण्याचे शिवधनुष्य आपल्या खांद्यावर आले आहे. त्यामध्यमातून गावागावात गुरव समाजाचे संघटन करून तेथील स्थानिक प्रश्नाबरोबरच शासन दरबारी असणारे ही प्रश्न आक्रमकपणे मांडणार असल्याचे मत अखिल गुरव समाज संघटनेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय कार्याध्यक्ष शितल उर्फ विजय शिंदे यांनी परखडपणे मांडले.

PCMC : पवना बंदिस्त जलवाहिनीवर बंदी उठली, आयुक्त म्हणतात…

निगडी प्राधिकरण येथील ग दि माडगूळकर नाट्यगृहात आयोजित अखिल गुरव समाज संघटनेचे वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब शिंदे, प्रदेशाध्यक्ष वसंत बंडावणे , सुधाकर खराटे सुरेखाताई तोरडमल सारंग कथलकर यांच्यासह प्रदेश, विभाग, जिल्हास्तरीय पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सभेत या सभेमध्ये संघटनेचा वार्षिक आढावा व संघटनेची पुढील वाटचाल व ध्येयधोरणे यावर एकमताने विचार विनिमय करून निश्चित धोरण ठरवण्यात आले तसेच नवनियुक्त पदाधिकारी यांस नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.

वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करताना राष्ट्रीय कार्याध्यक्ष शिंदे पुढे म्हणाले, राज्य सरकारने संत काशीबा महाराज महामंडळाची निर्मिती केली आहे. गुरव समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी या महामंडळाच्या माध्यमातून निधीची तरतूद केली आहे. त्यामध्यमतून राज्याच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या गुरव समाजाला संघटित करून त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी विशेष करून लक्ष देण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे.

त्याचबरोबर गुरव समाजातील युवकांना स्वताच्या पायावर उभा करण्यासाठी छोटे मोठे उद्योग व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी प्रामुख्याने लक्ष देणार असून महिला भगिनींना ही त्यांच्या पायावर उभा करण्यासाठी शासनाच्या विविध विभागाच्या योजनाच्या माध्यमातून त्यांना मदत करण्यासाठी सर्व समाजाचे राष्ट्रीय, प्रदेश, विभाग व जिल्हास्तरीय कार्यकारिणी प्रयत्न करणार असल्याचे मत राष्ट्रीय कार्याध्यक्ष शितल उर्फ विजय शिंदे यांनी मत व्यक्त केले.

यावेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब शिंदे म्हणाले समाजाच्या सामाजिक स्तर सुधारण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाय योजनांची माहीत देत राष्ट्रीय कार्याध्यक्ष शितल उर्फ विजय शिंदे यांच्या भक्कम साथीने भविष्यातील येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रदेश, विभाग आणि जिल्हास्तरीय मेळावे घेऊन युवकांचे संघटन करून या युवक संघटनेच्या माध्यमातून समाजाचा दबाव गट निर्माण करून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित येत लधा उभा करणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाचे नियोजन अखिल गुरव समाज संघटना पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष किसन जाधव, कार्याध्यक्ष संतोष गुरव, युवाध्यक्ष विशाल शेंडे यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.