PCMC : पवना बंदिस्त जलवाहिनीवर बंदी उठली, आयुक्त म्हणतात…

एमपीसी न्यूज – पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरील बंदी राज्य शासनाने आज उठविली आहे. त्यामुळे पाईपलाईनचे काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Pune : महर्षी नगरमध्ये टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड सुरूच

पवना बंद जलवाहिनी योजनेवरील स्थगिती उठविल्यानंतर आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह म्हणाले, ‘’पिंपरी-चिंचवड सारख्या झपाट्याने वाढणार्‍या शहरात स्वच्छ आणि सतत पाणी पुरवठा करणे ही काळाची गरज आहे. पवना बंद जलवाहिनी योजनेवरील स्थगिती १२ वर्षांनंतर उठली हे महापालिकेसाठी एक निर्णायक वळण आहे.

नागरिकांसाठी ही आनंदाची बाब असून शहराचा विकसनशील शाश्वत मार्ग मोकळा करण्यात आणि पाणीपुरवठ्याच्या समस्या दूर करण्यास यामुळे मदत होईल, तसेच महापालिका विविध प्रकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने निर्णायक पाऊले उचलण्यास प्रयत्न करेल.’’

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.