Talegaon Dabhade : शाळांनी नाविन्याचा ध्यास घेऊन आपली वाटचाल करावी – सोहनलाल जैन

एमपीसी न्यूज – शाळांनी वेळोवेळी नाविन्याचा ध्यास घेऊन अद्ययावत ज्ञानाशी एकरूप होऊन आपली वाटचाल इतरांपुढे आदर्श म्हणून ठेवावी. यामुळे अनेक संस्था प्रेरणा घेऊन पुढे जातील आणि यशस्वी होतील. ज्यातून विश्वगुरू भारताची प्रतिमा नवीन पिढी पुढे निर्माण होईल. असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ सोहनलाल कुंदनमल जैन यांनी केले.

Alandi : नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी किमान एक तरी झाड लावावे:के के निकम

तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील विश्व कल्याण एज्युकेशन सोसायटीचे जैन इंग्लिश स्कूल या शाळेचा रौप्य महोत्सवी वर्षाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमात सोहनलाल कुंदनमल जैन प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

 

याप्रसंगी मावळ तालुका माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, तळेगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष ॲड रवींद्र दाभाडे, राजेंद्र जांभुळकर, तळेगाव शहर भाजप अध्यक्ष रवींद्र माने, निर्मल निंबजिया, लक्ष्मण माने, माजी नगरसेवक श्रीराम कुबेर,माजी सभापती संतोष खांडगे,राजेश सरोदे,सुहास गरुड,सुरेश दाभाडे, अशोक काळोखे, माजी सभापती राजेंद्र दाभाडे,दिनेश शहा,विनायक अभ्यंकर, डॉक्टर आनंद परांजपे, गिरीश खेर नंदकुमार काळोखे, विलास काळोखे, सचिन टकले, डॉ शाळीग्राम भंडारी,महेशभाई शहा, सरस्वती विद्यालयाचे अध्यक्ष सुरेश झेंड, दिलीप कुलकर्णी, विश्वास देशपांडे, डॉ विनया केसकर,ज्योती चोळकर, त्याचबरोबर तळेगावातील बहुसंख्य मान्यवरांच्या तसेच शाळेचे सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापिका शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

 

शाळेचा रौप्य महोत्सवी वर्षाचा आरंभ सोहळा शाळेचे ब्रीदवाक्य असणाऱ्या भव्य दिव्य प्रतिमेच्या अनावरणाने जल्लोषपूर्ण उत्साही वातावरणात  संपन्न झाला.

 

ज्येष्ठ विधीज्ञ जैन यांनी विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास जडणघडण, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय उच्च दर्जा टिकवण्यासाठी त्यांना नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवण्यासाठी शाळेला शुभेच्छा देत म्हणाले की डमी क्लासेस आणि प्रायव्हेट ट्युशन्स या संदर्भात काहीतरी प्रतिबंधात्मक नियम लागू करण्यासंबंधी विचार करणे हि काळाची गरज आहे. जेणेकरून सरकारी आणि खाजगी शाळांना आदर्श विद्यार्थी घडविणे सुसह्य होईल आणि पालकांचे देखील हित लक्षात घेतले जाईल.

 

तसेच शाळांनी वेळोवेळी नाविन्याचा ध्यास घेऊन अद्ययावत ज्ञानाशी एकरूप होऊन प्रत्येक संस्थेने आपली वाटचाल इतरांपुढे आदर्श म्हणून ठेवली तर अनेक संस्था प्रेरणा घेऊन पुढे जातील यशस्वी होतील जेणेकरून विश्वगुरू भारताची प्रतिमा नवीन पिढी पुढे निर्माण होईल. असे प्रतिपादन एस. के. जैन यांनी याप्रसंगी केले.

 

प्रमुख अतिथी विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी शाळेचे सामाजिक बांधिलकी जपणारी शाळा म्हणून सहकार्य भावनेबद्दल भरभरून कौतुक करून स्पर्धात्मक युगात शाळेचे विद्यार्थी नक्कीच आकाशाला गवसणी घालतील अशी सदिच्छा व्यक्त केली.

 

याप्रसंगी  माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रॅक्टिकल शिक्षण महत्त्वाचे आहे  हे सांगत असताना जगातल्या सर्व चांगल्या गोष्टींचा स्वीकार करा, ध्येय निश्चित ठेवा आणि प्रयत्न करा ही प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना याप्रसंगी केले.

 

याप्रसंगी निर्मळ वारीच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करणारे सर्वेसर्वा  संतोष दाभाडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ताऊन सुलाखून सुसज्ज स्थान निर्माण करणारी गरुड झेप घेणारी जैन इंग्लिश स्कूल पुढील पंचवीस वर्षात अतिशय महत्त्वाच्या घडामोडींनी नावारूपाला येईल अशी ग्वाही याप्रसंगी अध्यक्ष डॉ.  दीपक शहा यांनी दिली.

 

याप्रसंगी माजी आमदार नरसिंग बेंगजी तसेच माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी बलशाली आधुनिक भारताचा सुजाण सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा संदेश दिला.

 

तसेच याप्रसंगी गणेश भेगडे यांनी संस्कार आणि शिक्षण याचा समतोल राखून आदर्श विद्यार्थी घडवणारी शाळा म्हणजे जैन इंग्लिश स्कूल असे कौतुक करून रौप्य महोत्सवी वर्षासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

 

याप्रसंगी शाळेचे चेअरमन प्रकाश ओसवाल यांनी प्रास्तविकाच्या माध्यमातून शाळेचा पंचवीस वर्षांचा यशस्वी प्रवास भाषणातून व्यक्त केला. संस्थेचे सचिव इंदरमल ओसवाल यांनी स्वागत केले.

 

 

रौप्य महोत्सवी वर्षाचा आरंभ आनंदी उत्साही वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता फाकटकर आणि अतिथींचा परिचय आरती पेंडभाजे यांनी तर आभार  दिलीप पारेख यांनी मानले.

 

कार्यक्रमाचे नियोजन राकेश ओसवाल, दिलीप वाडेकर व तसेच शाळेच्या तिन्ही मुख्याध्यपिका यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.