Alandi : नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी किमान एक तरी झाड लावावे:के के निकम

एमपीसी न्यूज : निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव के.के. निकम यांनी आळंदीतील (Alandi) इंद्रायणीनगर येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात केले.

Pimpri News : धक्कादायक! गाडीखाली चिरडून श्र्वानाला ठार मारले

इंद्रायणीनगर येथे माजी नगरसेवक सचिन गिलबिले सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून रस्त्यालगत वड, पिंपळ, चिंच, जांभूळ, हिरडा, बेहडा, आवळा, बेल, पळस, करंज आदी विविध जातींच्या झाडांचे रोपन करण्यात आले.

 

यावेळी नगरसेवक सचिन गिलबिले, रूस्तुम तौर, संतोष वायाळ, पांडूरंग भिसे, दिलीप रौंधळ, वासुदेव देशमुख, दिलीप जाधव, नवनाथ आंधळे, दत्ता शेवाळे, अमोल मुंडे, संभाजी फड, शिवाजी पवार तसेच इंद्रायणीनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.