Shirgaon : रस्त्याच्या कडेला थांबलेल्या टेम्पोमधून एक लाख रुपयांची दारू चोरीला

एमपीसी न्यूज : रस्त्याच्या कडेला थांबलेल्या (Shirgaon) टेम्पोचे ताडपत्री काढून चोरांनी टेम्पोमध्ये एक लाख वीस हजार रुपयांचे दारू चोरून नेली आहे. हा प्रकार 21 जुलै रोजी पहाटे पुणे मुंबई एक्सप्रेस वे महामार्गावर उर्से टोलनाक्याजवळ घडला.

याप्रकरणी आप्पासाहेब काकासाहेब नागरे (वय 33 जालना) यांनी शुक्रवारी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : राज्यपाल रमेश बैस सोमवारी पिंपरीत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे (Shirgaon) त्यांचा टेम्पो एम एच 24 ए यु 32 43 रस्त्याच्या कडेला लावून झोपले होते. यावेळी चोराने टेम्पोची ताडपत्री फाडून दोरी कापून टेम्पोतील 14 दारूचे बॉक्स चोरले. ही दारू तब्बल एक लाख वीस हजार 960 रुपयांची होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून ते चोराचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.