Pimpri : राज्यपाल रमेश बैस सोमवारी पिंपरीत

एमपीसी न्यूज – डॉ. डी. वाय पाटील (अभिमत) विद्यापीठाच्या 14 व्या पदवी प्रदान (Pimpri ) समारंभासाठी राज्यपाल रमेश बैस हे सोमवारी (दि. 14) पिंपरीत येणार आहे.

पिंपरी येथील विद्यापीठाच्या सभागृहात मंगळवारी सकाळी 11 वाजता हा समारंभ होणार आहे. या कार्यक्रमात कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष अरुण फिरोदिया, प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. पी. एन. राजदान, यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

Chandani Chowk : केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते झाले चांदणी चौकातील नव्या पुलाचे लोकार्पण

या समारंभात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधील परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या 33 विद्यार्थ्यांना या वेळी सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात येईल. विविध विद्याशाखेतील 4095 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येत असून यामध्ये 14 विद्यावाचस्पती (पीएच.डी.), 3015 पदव्युत्तर पदवी, 1055 पदवी व 11 पदविका या अशा एकूण 8 विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.