MP Sanjay Jadhav: परभणीचे खासदार संजय जाधव शिंदे गटात दाखल, पंढरपुरात महापूजेला हजेरी

शिवसेनेला धक्का!

एमपीसी न्यूज: शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या गटाने वेगळी वाट धरली असली तरी देखील शिवसेनेतील गळती काही कमी होण्याचं नाव घेत नाही. आता आमदारांनंतर खासदारही एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल होत असल्याचं दिसतयं. (MP Sanjay Jadhav) परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव हे मुख्यमंञी एकनाथ शिंदे गटात दाखल झाल्याची सुञांची माहिती आहे. पंढरपुरात शासकीय महापुजेला त्यांनी हजेरी लावली.

 

IND-ENG T-20 : दुसऱ्या सामन्यातील दणदणीत विजयासह भारताने जिंकली मालिकाही

 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीआधी शिवसेनेचे खासदार शिंदे गटात दाखल होणार असल्याची चर्चा आहे. संजय जाधव यांनी महापुजेला हजेरी लावल्यानं मुख्यमंञी एकनाथ शिंदेनी मंदिरात संजय जाधव यांचा सत्कार केला.शिवसेनेत आमदारांबरोबर आता खासदारांचाही बंड हेणार असल्याच दिसतयं. (MP Sanjay Jadhav) यापूर्वी एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे, खासदार भावना गवळी आणि आता खासदार संजय जाधव हे देखील शिंदे गटात दाखल झाल्याची माहिती आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.