Shravan: श्रावण महिन्यातील पोथी वाचन म्हणजे एक चालते बोलते विद्यापीठ !

एमपीसी न्यूज: हिंदू संस्कृती मध्ये पवित्र महिना असलेला श्रावण व या महिन्यामध्ये केलेली उपासना वेे्ज्ञानिक आणि अध्यात्मिक दृष्टीने देखील लाभदायक ठरते, म्हणूनच व्रतवैकल्या सोबत ग्रंथ वाचन व विविध पोथीचे पारायण ग्रामीण भागामध्ये अजूनही केले जाते.(Shravan) साते मावळ मध्ये या परंपरे मध्ये खंड पडलेला नाही व अजूनही पोथी व ग्रंथांचे पारायण केले जाते.चातुर्मासातील सर्वात श्रेष्ठ महिना म्हणून याची ओळख आहे.आषाढी अमावस्येला दिव्याची आवस केल्यानंतर सर्व व्रतवैकल्यांना सुरूवात करण्यात येते. श्रावण महिना हा उत्सवांचा महिना म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच याला सणांचा राजा श्रावण असे म्हणतात.

बरेच मराठी सण या महिन्यात असतात. विशेषतः महिलांसाठी हा महिना खास असून नवविवाहीतांसाठी तर माहेरी जाण्याची जणू पर्वणीच असते. श्रावणी सोमवारपासून ते अगदी श्रावणी आमावस्येपर्यंत अनेक सण या महिन्यात असतात आणि त्यामुळे याला सणांचा राजा म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरत नाही.(Shravan) या श्रावण महिन्यात पूर्वी गावा गावात विविध पोथी वाचन चालायचे पण हल्ली खूप दुर्मिळ होत चालेले आहे. पूर्ण एक महिना या भक्तीरसात सर्व चिंब होऊन जातात. एक व्यक्ती ग्रंथवाचन करते व एक ज्येष्ठ व्यक्ती निरूपण सांगते,पोथी वाचन आणि एक एक अध्याय आणि निरूपण केले जाते,आणि त्याच्या भोवती बसलेले श्रोते मनोभावे ते ऐकत असतात, असे सुंदर चित्र अजूनही मंदिरांमध्ये आणि घराघरांत दिसत आहे. ग्रंथ विविध असतात त्यामध्ये नवनाथ भक्तीसार, हरीविजय,भक्ती विजय, रामायण, सिध्दांतबोध, दासबोध, शिवलीलामृत,हरिविजय आदी ग्रंथाचे वाचन केले जाते शेवटी अध्याय समाप्ती होवून महाप्रसाद चे आयोजन केले जाते.

Toll Free For Ganpati Festival : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफीची सवलत – मुख्यमंत्र्यांची घोषणा

खरं तर श्रावणातील पावसाची विविध रूपे असतात आणि हेच श्रावणातील पावसाचे वैशिष्टय समजण्यात येते. श्रावण सुरू झाल्यावर पावसाची रिमझिम सुरू होते. क्षणात ऊन आणि क्षणात पाऊस हेदेखील श्रावणातील पावसाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अशा या पावसाळामुळे निसर्गातही अनेक बदल होतात आणि संपूर्ण सृष्टी हिरवीगार दिसू लागते आधुनिक युगात वाचन संस्कृती हळूहळू कमी होत आहे, ग्रामीण भागांत मात्र श्रावण महिन्यातील धार्मिक ग्रंथवाचनाच्या माध्यमातून वाचनसंस्कृती जोपासल्याचे चित्र अजूनही गावागावांत दिसते.(Shravan) साते गावासारख्या गावांनी जोपासलेली ही वाचनसंस्कृती सर्वांनाच प्रेरणादायी आहे असे येथील ग्रामस्थ  तुकाराम आगळमे,भरत रामभाऊ आगळमे,बाळू मारुती भालेकर,संजय शिंदे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.