Pune : कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये ‘एम. एस. डब्ल्यूू – समाजकार्य’ पदव्युत्तर अभ्यासक्रम

एमपीसी न्यूज- ‘कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसेस’, पुणेच्या वतीने एम. एस. डब्ल्यूू – समाजकार्य ‘ पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती ​कर्वे समाज सेवा ​संस्थेचे संचालक डॉ. दीपक वलोकर यांनी ​पत्रकाद्वारे ​दिली.

दोन वर्षाच्या, पूर्ण वेळ तसेच सेमिस्टर व ‘चॉइस बेस क्रेडीट सिस्टम’वर आधारित या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दि 21 जून रोजी देशपातळीवरील प्रवेश परीक्षा होणार आहे.

प्रवेश अर्ज ऑनलाइन भरण्याकरिता कर्वे समाज सेवा संस्थेच्या www.karve-institute.org या संकेतस्थळावर उपलब्ध झाले असून, अर्ज डाऊनलोड करून, भरुन महाविद्यालयाच्या कार्यालयात प्रवेश अर्ज जमा करता येतील. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख दि. 11 जून 2018 असून, प्रवेश परीक्षा दि. 19 जुन, 2018 रोजी आणि मुलाखत व गट-चर्चा दि. 21 जुन, 2018 या तारखेला आहेत. कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच ज्या विदयार्थ्यांनी 2018 मध्ये पदवी परीक्षा दिली आहे ते विद्यार्थी सुद्धा प्रवेश अर्ज भरून प्रवेश परीक्षा देऊ शकतात. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या पदवीधरांना नियमानुसार प्राधान्य दिले जाते.

प्रवेश अर्ज व संपर्कासाठी ‘कर्वे समाज सेवा​ संस्था​’, वनदेवी मंदिराशेजारी 18, हीलसाईड, कर्वेनगर, पुणे 411052, दूरध्वनी: 7517564210 किंवा [email protected], येथे संपर्क करण्यात यावा असे आवाहन डॉ. दीपक वलोकर ​(संचालक​, ‘कर्वे समाज सेवा संस्था​)यांनी केले आहे.

​’​कर्वे समाज सेवा संस्था​’​ही पुण्यातील व देशातील समाजकार्याचे शिक्षण देणारी एक नामवंत शैक्षणिक संस्था असून, नॅक ‘ मानाकिंत ‘अ’ दर्जा प्राप्त व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.