Bhosari: पाण्याच्या तक्रारी येऊ देऊ नका: आमदार लांडगेंच्या अधिका-यांना सूचना

भोसरीतील नगरसेवकांना लक्ष देण्याच्या सूचना

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभेत नियमित पाणीपुरवठा व्हावा. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोणालाही पाणी कमी पडू नये. नागरिकांच्या पाणीपुरवठ्याबाबत कोणत्याही तक्रारी येऊ देऊ नका, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी महापालिका अधिका-यांना दिल्या. तर, पाणी जपून वापरणे आणि तक्रारीबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना भोसरीतील नगरसेवकांना दिल्या.

भोसरीतील इ प्रभाग कार्यालयात पाण्यासंदर्भात नियोजनबध्द बैठक आमदार महेश लांडगे यांनी घेतली. यावेळी नगरसेवक आश्विनी जाधव, कमल घोलप, नितीन लांडगे, सागर गवळी, विकास डोळस, लक्ष्मण उंडे, भीमा फुगे, वसंत बो-हाटे, यशोदा बोईनवाड, सारिका लांडगे, सुवर्णा बुर्डे, राहुल जाधव, कुंदन गायकवाड, स्वीकृत सदस्य दिनेश यादव, स्वीकृत नगरसदस्य पांडुरंग भालेकर, राजेंद्र लांडगे, संतोष मोरे, अजित बुर्डे, शांताराम भालेकर, सचिन तापकीर, नमंगेश शिंगणे, पाणीपुरवठा अधिकारी एस. ए. तुपसाखरे, व्ही. बी. शिंदे, वि. भी. कांबळे आदी उपस्थित होते.

महापालिकेच्या पाईपलाइन, व्हॉल्व्ह, पाण्याच्या टाक्यांजवळ मोठ्या प्रमामात पाणी गळती होते. ती रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. काही प्रभागात सकाळी सहा ते नऊ या वेळेत तर काही भागात संध्याकाळी सहा ते नऊ यावेळेत पाणी सोडावे आणि पाणी जपून वापरा, पाण्यासंदर्भात तक्रारी येता कामा नये. तसेच दूषित पाणीपुरवठा होऊ नये, यासाठी पावसाळ्यापूर्वी पाण्याच्या टाक्या साफ करण्याचे आदेश त्यांनी अधिका-यांना दिले.

अधिका-यांबरोबर प्रत्येक वॉर्डात पाणी आले की नाही ? याची जबाबदारी नगरसेवकांनी घ्यावी, अशा सूचना त्यांनी नगरसेवकांना केल्या. तर, पावसाळ्यापूर्वी ड्रेनेजच्या दुरुस्तीची कामे करुन घेण्यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.