Sonu to join Kapil Sharma show: सोनू लावणार कपिल शर्माच्या शो मध्ये उपस्थिती

एमपीसी न्यूज – हजारो स्थलांतरितांना आपल्या गावी पोचण्यासाठी मदत करणारा देवदूत म्हणून सोनू सूद मागील काही काळापासून कोणतेही श्रेय न घेता स्वतहून काम करत आहे. या काळातील आपले अनुभव सोनू लवकरच छोट्या पडद्यावर शेअर करताना दिसणार आहे. विनोदवीर कपिल शर्माच्या द कपिल शर्मा शोच्या पहिल्या भागात सोनू हजेरी लावणार आहे. लॉकडाऊननंतर या आठवड्यात या शोचा पहिला भाग प्रसारित होणार आहे.

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो म्हणून द कपिल शर्मा शो याकडे पाहिलं जातं. उत्तम सूत्रसंचालन आणि विनोदबुद्धी यांच्या जोरावर कपिलने या शोचं नाव अनेकांच्या मनावर कोरलं आहे. त्याच्यासोबत या कार्यक्रमातील अन्य कलाकारही तितकेच लोकप्रिय आहेत. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात या सगळ्यांची प्रेक्षकांसोबत भेट न झाल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

_MPC_DIR_MPU_II

सध्या या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या शोमध्ये सोनू सूदने गरजूंना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी कशी मदत केली. या कार्यात त्याला कोणते अडथळे आले याचे अनुभव तो सांगणार आहे.

विशेष म्हणजे देशातील नागरिकांना मदत केल्यानंतर सोनूने त्याचा मोर्चा विदेशात अडकलेल्या लोकांकडे वळविला आहे. याशिवाय प्रवासी मजुरांना नवीन काम मिळावे याकरता सोनूने जॉब हंट अॅप लाँच केले आहे. ‘प्रवासी रोजगार’ असे या अॅपचे नाव आहे. हे अॅप प्रवासी कामगारांना नोकरी शोधण्यासाठी सर्व आवश्यक माहिती देईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.