Sportsfield Monsoon League : आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीची विजयाची हॅट्रीक; एनएसएफए, पुणे संघाचा पहिला विजय

एमपीसी न्यूज : स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित पहिल्या ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ (Sportsfield Monsoon League) अजिंक्यपद 14 वर्षाखालील 30-30 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने सलग तिसरा तर, एनएसएफए, पुणे संघाने स्पर्धेत पहिला विजय मिळवून गुणांचे खाते उघडले.

सातारा रोड येथील टेंभेकर फार्मस् क्रिकेट मैदानावर झालेल्या या स्पर्धेत इशान अमिनभावी याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा 6 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव 99 धावांवर गडगडला. आर्यन्स् संघाच्या अभ्युदय दहीभाते (3-20), इशान मिश्रा (2-19) आणि इशान अमिनभावी (1-13) यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून फलंदाजांना जाळ्यात अडकवले. आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीने ही धावसंख्या 17.2 षटकात व 4 गडी गमावून पूर्ण केली. आदर्श रावल याने 42 धावा, इशान अमिनभावी याने 30 धावांची खेळी करून संघाचा विजय सोपा केला.

तनिष्का राठोड हिच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर एनएसएफए, पुणे संघाने खेल क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा 6 गडी राखून पराभव करत गुणांचे खाते उघडले. पहिल्यांदा फलंदाजी करताना खेल क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव 28.5 षटकामध्ये 128 धावांवर मर्यादित राहीला. मयुरेश मुदगल याने 53 धावांची खेळी केली. एनएसएफए संघाच्या तनिष्का राठोड हिने 31 धावात ३ गडी बाद करून चमकदार गोलंदाजी केली. एनएसएफए, पुणे संघाने हे आव्हान 20.1 षटकात व 4 गडी गमावून पूर्ण केले. विराट सांगवी (29 धावा) आणि ओम भामरे (31 धावा) यांनी फलंदाजीमध्ये योगदान देत संघाला विजय मिळवून दिला.

Sportsfield Monsoon League

Grand Prix Badminton Tournament : चमकदार विजयासह अंकित, रौनक, अभिनव मुख्य फेरीत

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः Sportsfield Monsoon League

स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट अ‍ॅकॅडमीः 29.4 षटकात 10 गडी बाद 99 धावा (ध्रुव शिंदे 14, अर्जुन पवार 13, ध्रुविल रायठा 13, अभ्युदय दहीभाते 3-20, इशान मिश्रा 2-19) पराभूत वि. आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीः 17.2 षटकात 4 गडी बाद 100 धावा (आदर्श रावल 42, इशान अमिनभावी 30, सार्थक पाटील 13, सार्थ माळी 2-27, सोहम मोहीते 2-22); सामनावीरः इशान अमिनभावी;

खेल क्रिकेट अ‍ॅकॅडमीः 28.5 षटकात 10 गडी बाद 128 धावा (मयुरेश मुदगल 53 (56, 9 चौकार), मितेश दमानी 28, तनिष्का राठोड 3-31, अर्थव सुर्यवंशी 3-29, विरेन नयनीत 2-6) पराभूत वि. एनएसएफए, पुणेः 20.1 षटकात 4 गडी बाद 129 (विराट सांगवी 29, ओम भामरे 31, मयुरेश मुदगल 2-35); सामनावीरः तनिष्का राठोड;

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.