Sportsfield Monsoon League : सनराईझ क्रिकेट स्कूल संघाने उघडले गुणांचे खाते; आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा सलग दुसरा विजय

एमपीसी न्यूज : स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंटतर्फे आयोजित पहिल्या ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ अजिंक्यपद 14 वर्षाखालील 30 – 30 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत सनराईझ क्रिकेट स्कूल संघाने प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून स्पर्धेत पहिला विजय मिळवत गुणांचे खाते उघडले.आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीने स्पर्धेत सलग दुसर्‍या विजयाची नोंद केली.

सातारा रोड येथील टेंभेकर फार्मस् क्रिकेट मैदानावर झालेल्या या स्पर्धेत आदिथ बर्वे याने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे सनराईझ क्रिकेट स्कूल संघाने खेल क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा 8 गडी राखून पराभव केला.पहिल्यांदा फलंदाजी करताना खेल क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव 79 धावांवर मर्यादित राहीला.यामध्ये सनराईझच्या आदित बर्वे याने 9 धावात 3 गडी बाद करून खेल संघाच्या डावाला खिंडार पाडले.सनराईझ क्रिकेट स्कूलने हे आव्हान 14.5 षटकात व 2 गडी गमावून पूर्ण केले.

अभ्युदय दहीभाते याच्या भेदक मार्‍यामुळे आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीने एन.एस.एफ.ए., पुणे संघाचा 3 गडी राखून पराभव केला.पहिल्यांदा फलंदाजी करताना एन.एस.एफ.ए. संघाला 30 षटकात 113 धावा जमविता आल्या.आर्यन्स्च्या अभ्युदय दहीभाते याने 16 धावात 3 गडी बाद केले.आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीने हे आव्हान 23.5 षटकात व 7 गडी गमावून पूर्ण केले.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरी 

खेल क्रिकेट अ‍ॅकॅडमी : 26 षटकात 9 गडी बाद 79 धावा (रितिक पारेख 21, सागर चव्हाण 10, आदित बर्वे 3 – 9, नील रचेली 1 – 6) पराभूत वि. सनराईझ क्रिकेट स्कूलः 14.5 षटकात 2 गडी बाद 83 धावा (शौनक राजे नाबाद 36, नील रचेली 19, आदित्य गोसावी 2 – 10); सामनावीरः आदिथ बर्वे;

एन.एस.एफ.ए., पुणे : 30 षटकात 9 गडी बाद 113 धावा (राज मोरे 38, क्षितीज जाधव 11, अभ्युदय दहीभाते 3 – 16, शुभम गायकवाड 3 – 12) पराभूत वि. आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी : 23.5 षटकात 7 गडी बाद 114 धावा (आदित्य मोरे 18, अर्णव पाटील 17, सार्थक पाटी 13, नील चंद्रात्रे 2- 30); सामनावीर : अभ्युदय दहीभाते;

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.