Sportsfield Monsoon League : 22 यार्ड्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडिया संघांचा दुसरा विजय

एमपीसी न्यूज – स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंटतर्फे आयोजित पहिल्या ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ अजिंक्यपद 14 वर्षाखालील 30 – 30 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत 22 यार्ड्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघ आणि गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडिया अ संघाने आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून दुसरा विजय नोंदविला.

सातारा रोड येथील टेंभेकर फार्मस् क्रिकेट मैदानावर झालेल्या या स्पर्धेत श्रेयस श्रीवरकर याच्या शतकी खेळीच्या जोरावर 22 यार्ड्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीने फल्लाह क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा 184 धावांनी एकतर्फी पराभव करत सलग दुसरा विजय मिळवला.पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रेयस श्रीवरकर याच्या 65 चेंडूमध्ये 11 चौकार आणि 5 षटकारासह साकारलेल्या 100 धावांच्या जोरावर 22 यार्ड्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीने 30 षटकात 250 धावांचे आव्हान उभे केले.श्रेयस याला दुसर्‍या बाजुने नीलमेघ नागवकर (38 धावा) आणि आर्यन पवार (31 धावा) यांनी सुरेख साथ दिली. याला उत्तर देताना फल्लाह क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव 66 धावांवर गडगडला.

इशान शर्मा याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडिया अ संघाने निंबाळकर वॉरीयर्सचा 9 धावांनी सहज विजय मिळवला.पहिल्यांदा फलंदाजी करताना गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडिया संघाने 18 षटकात 71 धावा जमविल्या.राघव पै (25 धावा) आणि हर्षदीप सिंग (नाबाद 15 धावा) यांनी संघाला जेमतेम धावसंख्या उभी करून दिली. पण गॅरी कर्स्टन संघाच्या गोलंदाजांनी निंबाळकर वॉरीयर्सच्या फलंदाजांना अचूक जाळ्यात पकडत ही धावसंख्या कठीण केली. निंबाळकर संघाचा डाव 17.1 षटकात 62 धावा गडगडला.यामध्ये निंबाळकर संघाकडून गोविंद ठाकूर (24 धावा) आणि मल्हार गोरे (13 धावा) यांनी प्रतिकार केला.इशान शर्मा याने 11 धावात 3 गडी बाद करून विजयात मोलाचा वाटा उचलला.

सामन्याचा संक्षिप्त निकाल : गटसाखळी फेरी :
22 यार्ड्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी : 30 षटकात 7 गडी बाद 250 धावा (श्रेयस श्रीवरकर 100 (65, 11 चौकार, 5 षटकार), नीलमेघ नागवकर 38, आर्यन पवार 31, केशव नायक 3 – 34) वि.वि. फल्लाह क्रिकेट अ‍ॅकॅडमी : 21.2 षटकात 10 गडी बाद 66 धावा (यश ससाणे 20, तुशित तुलसीयान 3 -17, प्रतिक कडलक 2 – 6); सामनावीरः श्रेयस श्रीवरकर;

गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडिया अ : 18 षटकात 8 गडी बाद 71 धावा (राघव पै 25, हर्षदीप सिंग नाबाद 15, आयुष उभे 3 – 16, गोविंद ठाकूर 3 – 7) वि.वि. निंबाळकर वॉरीयर्स : 17.1 षटकात 10 गडी बाद 62 धावा (गोविंद ठाकूर 24, मल्हार गोरे 13, इशान शर्मा 3 – 11); सामनावीरः इशान शर्मा;

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.