Dehu road Police: देहुरोड पोलीस ठाण्यात हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत जनसंवाद

एमपीसी न्यूज : देहुरोड पोलीस ठाण्यात निगडी वाहतूक विभाग व देहूरोड पोलीस ठाणे व पोलीस मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने हर घर तिरंगा मोहिमेच्या जनजागृतीसाठी (Dehu road Police) पोलीस मित्र व पोलीस कर्मचारी यांच्यात जनसंवादाचे बुधवारी (दि.10) आयोजन करण्यात आले होते.

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील, निगडी वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षक विजया कारंडे, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे राज्य अध्यक्ष विजय पाटील, महिला प्रमुख अर्चना घाळी, विजय मुनोत,विभागीय अध्यक्ष विशाल शेवाळे, बाबासाहेब घाळी, जयेंद्र मकवाना,भरत उपाध्ये, बळीराम शेवते, विजय जगताप,विभावरी इंगळे, गौरी सरोदे संतोष चव्हाण,सतिश देशमुख उपस्थित होते.

River conservation: नदीसंवर्धनासाठी ‘नदी सुरक्षा पथकाची’ स्थापना

निगडी वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षिका विजया कारंडे म्हणाल्या,” स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पोलीस मित्र, एस पी ओ तसेच प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे कार्यकर्ते यांच्या संयुक्त सहभागाने निगडी विभागात 75 देशी-आयुर्वेदिक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.(Dehu road Police)सदभावना रॅली, तसेच 75 कर्तव्यदक्ष चालक व कर्तव्यदक्ष पोलीस मित्र यांचा मेडल देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

विजय पाटील म्हणाले,”पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वीर क्रांतिकारकांचे स्मरण ,हर घर तिरंगा,तसेच प्रबोधनात्मक विविध सामाजिक उपक्रम दिनांक 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट च्या दरम्यान राबविण्यात येणार आहेत. शहरातील नागरिकांनी त्यामध्ये सहभागी व्हावे.”

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.