Alandi Ganeshotsav : ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जय घोषात गणरायाचे आळंदीमध्ये आगमन

एमपीसी न्यूज : श्री गणेश चतुर्थी निमित्त (Alandi Ganeshotsav) आळंदी शहरात सकाळपासून गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जय घोषात गणरायाचे घरा घरामध्ये व सार्वजनिक मंडळामध्ये प्रतिष्ठापना करण्यात येत होती. गेली दोन वर्षे कोरोनाच्या साथीच्या संसर्गजन्य रोगामुळे राज्यात सर्वत्र निर्बंध होते. त्यामुळे गणेशोत्सवावर मर्यादा आल्या होत्या. पण, आता सर्व निर्बंध हटवले गेल्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या जल्लोषात लाडक्या बाप्पांचे ढोल ताश्याच्या वाद्यात वाजत गाजत लहान मोठ्या सार्वजनिक मंडळामध्ये आगमन होत आहे. श्रींच्या पूजेसाठी लागणारे विविध साहित्य, वस्तू, फळे यांच्या खरेदीसाठी ठीक-ठिकाणी दुकानांमध्ये मोठी गर्दी दिसत होती.

सार्वजनिक मंडळामध्ये लहान, तरुण, ज्येष्ठ एकत्र जमत मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने विधिवत पूजन करून श्री गणेशाची प्रतिष्ठापना करत होते. दहा दिवसांच्या उत्साहपर्वाला आज पासून प्रारंभ झाला आहे. सार्वजनिक मंडळांपासून घराघरात आकर्षक देखाव्यात, आकर्षक विद्युत रोषणाईत आणि मखरात गणराज विराजमान झाले आहेत.

Grand Prix Badminton Tournament : चमकदार विजयासह अंकित, रौनक, अभिनव मुख्य फेरीत

दहा दिवस बापाची सजावट, आरत्यांचे स्वर, बाप्पांची सुमधूर गीते, गौराईचे आगमन, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष ऐकायला मिळणार आहे. शहरात (Alandi Ganeshotsav) काही ठिकाणी धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम तसेच गणोत्सवानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन पाहायला भेटणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.