Dhankawadi Ganeshotsav : 9 सार्वजनिक मंडळानी एकत्रित येऊन रचला इतिहास

एमपीसी न्यूज : देशातील पहिल्या सर्वात (Dhankawadi Ganeshotsav) मोठ्या एकत्रित सार्वजनिक गणेश मंडळाची मिरवणुक आज धनकवडी येथील 9 सार्वजनिक गणशे मंडळे एकत्रित येऊन एक नवा इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार सर्व पुणेकर आणि गणेश भक्त बनले आहे. भक्ती, उमंग, उत्साह, जोश या सर्व गोष्टीने ही सार्वजनिक मिरवणूक गुलाबनगर, धनकवडी ते मोहन नगर, धनकवडी अशी निघाली. यावेळी ज्ञानप्रबोधिनी वाद्यपथक व युवा वाद्यपथक ढोल पथकाने संपूर्ण मिरवणूकीची शोभा वाढविली. निसर्गाने सुद्ध पाऊस पाडून बाप्पाचे जोरदार स्वागत केले.

या सार्वजनिक गणेश मिरवणूकीला प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेता वैभव वाघ, आमदार भीमराव तापकीर, माजी महापौर दत्ता धनकवडे, वर्षा तापकीर, सुमीत खेडेकर, विशाल तांबे बरोबर लाखो भक्त साक्षीदार बनले.

पोलिस विभागाने केलेल्या सूचनांचा सन्मान राखत धनकवडीतील केशव मित्र मंडळ, पंचरत्नेश्वर मित्र मंडळ, अखिल नरवीर तानाजी नगर मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मित्र मंडळ, फाईव्ह स्टार मित्र मंडळ, विद्यानगरी मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, रामकृष्ण मित्र मंडळ आणि अखिल मोहन नगर मित्र मंडळां या 9 मंडळांच्या अध्यक्षांनी एकत्रित येऊन हा नवा पायंडा पुण्यात नव्हे, तर संपूर्ण देशात प्रथमच घातला आहे.

Alandi Ganeshotsav : ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जय घोषात गणरायाचे आळंदीमध्ये आगमन

‘सन्मान प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव (Dhankawadi Ganeshotsav) मंडळाचा, अभिमान प्रत्येक कार्यकर्त्यांचा’ या उक्ती प्रमाणे ही मंडळे एकत्रित येऊन हा नवीन पायंडा घातला आहे. भविष्यात पुण्यात एकत्रित सार्वत्रिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होईल. धनकवडीतील मंडळांनी एकत्रित येऊन जे धाडस दाखविले आहे. ती पद्धत हळूहळू समाजात रुजावी. अशी भावना मोहननगर मित्र मंडळाचे अध्यक्ष अनिरूद्ध येवले यांनी सांगितले.

या सार्वत्रिक मिरवणूकीचे संपूर्ण जनतेने मोठ्या प्रमाणात स्वागत केले. तसेच मिरवणुकीच्या ठिकठिकाणी या ९ मंडळांचे अध्यक्ष व विजय क्षिरसागर, अनंत शिंदे, विकास मदणे, मिलिंद काळे, सोमनाथ शिर्के, समिर दिघे, चेतन चव्हाण, सुनील पिसाळ, प्रतिक कुंभारे, युवराज शिंदे, मयूर बुरसे, गुरूनाथ साळुंके, अथर्व देशपांडे, विशाल निगडे, अभिषेक तापकीर, अजय इंगळे, अभिजित भोपळे, शिरीष देशपांडे सागर साबळे, विजय क्षिरसागर, प्रतिक कुुंभारे, अभिषेक तापकीर आणि समीर दिघे आदि कार्यकर्ता जल्लोषात स्वागत करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.