Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे बुद्धिबळ स्पर्धेत यश

एमपीसी न्यूज – क्रीडा व युवक सेवा संचलनालय, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय,वलवण लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. यात कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या जित थोरात, अवधूत बानेकर तसेच श्रेया भसे यांनी यश संपादन केले आहे. त्यांची जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

मावळ तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा
सोमवार (दि 21) सप्टेंबर 2022 रोजी संपन्न झाली या स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील वयोगटामध्ये कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या कु.जीत चंद्रशेखर थोरात, मुलींमध्ये कु. श्रेया संतोष भसे यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.

17 वर्षाखालील वयोगटामध्ये कु.अवधूत महेश बाणेकर याने तृतीय क्रमांक प्राप्त केला या तिन्ही खेळाडूंची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे, संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे, शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर व सर्व शिक्षक यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.