Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडीयम स्कूलमध्ये स्वच्छता उपक्रम

एमपीसी न्यूज – तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलीत कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 1 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला ‘स्वच्छता ही सेवा ‘या मोहिमेअंतर्गत स्वछता उपक्रम राबविण्यात ( Talegaon Dabhade ) आला. या कार्यक्रम प्रसंगी प्रथम महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी इयत्ता दुसरीतील श्लोक भागवत व इयत्ता पाचवीतील जनकनंदिनी झा या विद्यार्थ्यानी महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांवर भाषण दिले. शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनी आपल्या भाषणात सांगीतले, की  देशातील स्वच्छतेबरोबर भ्रष्टाचारही नाहीसा झाला पाहिजे.
संस्थेचे खजिनदार अनिल ताणकर यांनी याप्रसंगी विध्यार्थ्यांना स्वछतेचे महत्त्व सांगून,गांधीजींचे सत्य बोलावे यावरील आत्मचरित्र वाचावे हे सांगून, वाचन करावे, हे मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे व खजिनदार गौरी काकडे उपस्थित होते.

यानंतर  इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व वर्गांची व शाळेच्या आतील व बाहेरील आवारातील स्वछता केली. सर्व विध्यार्थी झाडू, सुपली व खराटा हातात घेऊन स्वछता करत होते.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर, पर्यवेक्षिका ज्योती सावंत,रमा बागुल, कीर्ती कुलकर्णी व मीरा चव्हाण उपस्थित होत्या. शाळेतील सर्व शिक्षक या उपक्रमात सहभागी होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लावण्या भुजबळ यांनी केले. पुष्पलता व्यवहारे यांनी ( Talegaon Dabhade ) आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.