Dapodi : दापोडी येथे वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज- भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाने पादचारी व्यक्तीला धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. 21) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास दापोडी येथे जुना पुणे मुंबई महामार्गावर घडला.

ऋषिकेश इंद्रभान साखरे (वय 26, रा. दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचे चुलते नंदकुमार विठोबा साखरे (वय 55) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे बुद्धिबळ स्पर्धेत यश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चुलते नंदकुमार हे सोमवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास जुना पुणे मुंबई महामार्गावर दापोडी बीआरटी बस स्टॉप जवळ रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर आरोपी वाहन चालक घटनेची माहिती न देता निघून गेला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.